Swami Samarth Aarti

Swami Samarth Aarti

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

तुझे दर्शन होता जाती ही पापे
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते
वैकुंठीचे सुख नाही या परते, जय देव, जय देव

सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा
शरणागत तुज होतां भय पडले काळा
तुेझे दास करिती सेवा सोज्वळा, जय देव, जय देव

मानवरुपी काया दिससी आम्हांस
अक्कलकोटी केला यतिवेषे वास
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास
अज्ञानी जीवास विपरीत भास, जय देव, जय देव

र्निगुण र्निविकार विश्वव्यापक
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक
अनंत रुपे धरसी करणे मा एक
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख, जय देव, जय देव

घडता अनंत जन्म सुकृत हे गाठी
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

Swami Samarth Aarti 2

पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती l
सगुण रुपाने येऊनी स्वामी स्विकारा आरती l

हरीहर संगे ब्रम्हदेवही खेळे तव भाळी l
पुनव हासते प्रसन्नतेने मुखचंद्राचे वरी l

लाजविती रवी चंद्राला तव नयनांच्या ज्योती
सगुण रुपाने येऊनी स्वामी स्विकारा आरती l

पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओठी l
स्वासासंगे स्पंदन व्हावे तुझेच जगजेठी l

अघाद महिमा अघाद आहे स्वामी तव शक्ती
सगुण रुपाने येऊनी स्वामी स्विकारा आरती l

धर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्मती l
सत्कर्माचा यद्न्य घडावा झिझवूनी ही यष्टी

सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊनी मज हाती l
सगुण रुपाने येऊनी स्वामी स्विकारा आरती l

अहंपणाचा लोप करुनी कृतार्थ जीवन करा
पावन करुनी घ्यावे मजला तेजोमय भास्करा

अल्पशी भिक्षा घालूनी स्वामी न्यावे मज संगती l
सगुण रुपाने येऊनी स्वामी स्विकारा आरती l

पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती,
स्वामी करण्या तव आरती l
सगुण रुपाने येऊनी स्वामी स्विकारा आरती l

Swami Samarth Aarti

श्री स्वामी समर्थ आरती

श्री स्वामी समर्थ आरती

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Samarth

Shri Swami Samarth

Swami Samarth Aarti Youtube Video

Youtube Video

Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics In Marathi

Blog