Swami Samarth

श्री स्वामी समर्थ

Shri Swami Samarth Maharaj

Read The Blog

Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics

Tarak Mantra Marathi

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

View Progress

Tarak Mantra English

Nishank Hoi Re Manaa Nirbhay Hoi Re Manaa
prachand Swami Bal Pathishi Nitya Aahe Re Manaa ।
Manaa Atarky Avdhut He SmarnGami
Ashaky Hi Shaky Kartil Swami ।। 1 ।।

View Progress

Latest Articles

Shri Swami Samarth Prakat Din

Swami Samarth Prakat Din 2024 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन

Shri Swami Samarth Prakat Din 2024 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, श्री स्वामी समर्थ फोटो, स्वामी समर्थ स्टेटस मराठी, स्वामी समर्थ फोटो वॉलपेपर, स्वामी समर्थ …
Read More
Swami Samarth Tarak Mantra Pdf

Shree Swami Samarth Tarak Mantra Pdf

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरागुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे …
Read More
Shri Swami Samarth Prakat Din

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन Shri Swami Samarth Prakat Din

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन Shri Swami Samarth Prakat Din श्री स्वामी समर्थ फोटो, स्वामी समर्थ स्टेटस मराठी, स्वामी समर्थ फोटो वॉलपेपर, स्वामी समर्थ तारक …
Read More

Shree Swami Samarth

अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते. स्वामी समर्थ महाराजांनी इ.स 1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे 22 वर्षे येथे वास्तव्य केले. इ.स 1878 मध्ये मध्ये समाधी घेतल्याचे केवळ भासवून लौकिक दृष्ट्या देह संपवला. श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे आहे. ह्याची साक्ष म्हणजे वटवृक्षाखाली जिथे स्वामींनी समाधी घेतली त्या स्थळाचे ब्रीदवाक्य “हम गया नही जिंदा है” याची प्रचिती माझ्यासहीत अनेक स्वामी भक्तांनी घेतली असेल व रोज अनेकजण घेतात. त्यामुळेच दरोरोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जातात.

श्री स्वामी समर्थ महाराज पार्श्वभूमी

इ.स 1149 मध्ये छेली खेडे पंजाब येथे प्रगट होऊन भगवान श्री दत्त महाराजांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इ.स 1378 मध्ये पिठापूर (आंध्रप्रदेश) येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली.

इ.स 1528 मध्ये कारंजा येथून श्री नृसिंहसरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्र तयार केली. इ.स 1678 मध्ये नृसिंहसरस्वती या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इ.स 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे वास्तव्य केले.

Blog